मोदी सरकारच्या विरोधात तुमच्या मनात संताप आहे, त्याच्या अपयशाविषयी तुम्हाला राग आहे? तर मग तो व्यक्त करण्याची संधी काँग्रेस तुम्हाला देत आहे. येत्या १४ नोव्हेम्बरला देशाचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ‘युवा भारताचा आवाज‘ या नावाने काँग्रेसने भाषण स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती अ. भा. युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी यांनी दिली.

बेळगावात गुरुवारी काँग्रेस भवनात या’पळी मराठी’शी बोलताना सुरभी द्विवेदी म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात १० ऑक्टोबरला बेळगाव आणि चिक्कोडी येथे भाषण स्पर्धा घेण्यात येईल. यातील ५ विजेत्यांना जिल्हा प्रवक्ता म्हणून राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेतील १० विजेत्यांना राज्य प्रवक्ता म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात येईल. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नेमणूक करणार आहेत.
एकंदर कोरोना नियंत्रणातील अपयश, इंधन दरवाडीवर नियंत्रण आणण्यात अपयश या मुद्यांवरून काँग्रेसने अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष कार्तिक पाटील, शहर अध्यक्ष सैफ अली सेठ, पदाधिकारी अब्दुल देसाई, भरत नायक, सय्यद कालेअहमद, सिद्दीकी अंकलगी, मृणाल हेब्बाळकर, पवन राठोड आदी उपस्थित होते.



Recent Comments