बेळगावातील गांधीनगरमधील श्री शांतीनाथ भगवान बस्तीमध्ये चातुर्मासानिमित्त विशेष पूजा–अर्चा करण्यात येत आहेत.

होय, जैन धर्मात चातुर्मासाला विशेष महत्व आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या बस्तींमध्ये विशेष पूजाअर्चा करण्यात येतात. त्याचप्रमाणे बेळगावातील गांधीनगरातील श्री शांतीनाथ भगवान जैन बस्तीमध्येही चातुर्मासानिमित्त विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत. १६ दिवसांची षोडश कारण, १० दिवसांची दशलक्षण कारण आणि पंचमेरू सप्तमी, नवमी आदी धार्मिक विधिविधान पार पाडण्यात आले. जैन श्रावक-श्राविकांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी अधिक माहिती देताना गांधीनगरातील भरमा नानप्पा उपाध्ये यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या विशेष पूजाविधी केल्याने ८ प्रकारची कर्म लोप पावून पुण्यप्राप्ती होते, जीवनात सुख प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.

पूर्वी तीर्थंन्करांनी घालून दिलेल्या परिपाठाप्रमाणे आम्ही चालत आहोत. त्यामुळे मनुष्याचे कर्मदोष नाश पावतात आणि पुण्य प्राप्त होते अशी जैन धर्मियांची श्रद्धा आहे.


Recent Comments