सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाजवळच तंबू उभारून लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करून विजापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने आदर्श उपक्रम राबवला आहे.

होय, सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यातही तिसऱ्या लाटेची भीती सर्वांच्या मनात घर करून बसली आहे. या पार्श्वभूमीवर विजापुरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने काळाची गरज ओळखून वेगळाच सामाजिक उपक्रम राबविला आहे. महामंडळाच्या शिवाजी चौकातील मंडपाजवळच एक तंबू उभारून तेथे लोकांना लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे लस घेणारे लोकही याबाबत महामंडळाला धन्यवाद देत आहेत.



Recent Comments