Belagavi

‘महात्मर चरितामृत’चे २५ सप्टेंबरला होणार प्रकाशन

Share

 थोर पुरुषांचे चरित्र समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने अथणीच्या प्रभू चन्नबसव स्वामीजींनीमहात्मर चरितामृतहे पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन बेंगळुरातील श्री बसवेश्वर सुज्ञान मठात २५ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

: बेळगावात गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन बैलूरचे श्री निजगुणानंद स्वामींनी सांगितले की, पुस्तक प्रकाशन समारंभाला अनेक स्वामीजी, मठाधीशांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पुस्तकाद्वारे समाजातील थोर पुरुषांची चरित्रे घरोघरी, मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले, कोरोना काळात लोक घरे-दारे बंद करून बसले होते. तयावेळी अथणीच्या मोटगीमठच्या स्वामीजींनी २१६ थोर पुरुषांचे चरित्र लिहून ज्ञानाचे दार उघडले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करणार असून, या सोहळ्याला राज्यातील अनेक स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.

प्रभू चन्नबसव स्वामीजी म्हणाले, आपला भारत देश सर्व धर्मियांचे शांतीवन आहे. आम्ही सारे एकच आहोत हा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आ. महेश कुमठळ्ळी, डॉ. भैरमंगल रामगौडा, करवे राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा, संगीत दिग्दर्शक हंसलेखा, बी. आर. पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Tags: