हुक्केरी तालुक्यातील मावनूर गावात बैलगाडा शर्यतीदरम्यान वाद निर्माण होऊन दोन भावांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे.

बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील मावनूर गावात श्री बंदेम्मा जत्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीदरम्यान काही कारणास्तव वाद निर्माण झाला. यादरम्यान प्रकाश बसरिमदर यांच्यावर काही तरुणांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत प्रकाशचे बंधू गोपाळ बसरिमदर यांनी सदर तरुणांना जाब विचारला.
यामुळे सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाल्याने बसरिमदर बंधू जखमी झाले आहेत. सध्या दोघांनाही बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून यमकनमर्डी पोलिस ठाण्यात प्रकरण नोंद झाले आहे.


Recent Comments