Uncategorized

बनावट नोटांचा व्यवहार : चौघांना अटक

Share

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची घटना विजयपूर शहरात घडली आहे.  दुर्गप्पा शिवनप्पा रामरत्ती (४४, रा. लिंगसुर), किरण उर्फ भीमप्पा रामाप्पा हरिजन (२५, रा. महालिंगपूर), रमेश हनमंत सावलतोट (४४, रा. कोल्लारजवळील होलेहनगरगी) आणि रियाज काशीमसाब वालिकार (४४, रा. विजयपूर वज्र हनुमान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

केएसआरटीसी मेकॅनिक असलेल्या रियाझ वालीकार यांनी विजयपूर शहरातील वॉटर टँकजवळील एका दूधाच्या दुकानात ५०० रुपयांच्या खोट्या नोटा देत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर, याप्रकरणाचा तपास सुरू झाला. आरोपींकडून ५०० रुपयांच्या १,२२,५०० रुपयांच्या २४५ खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या.असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गांधीचौक पोलिस ठाण्याचे सीपीआय प्रदीप तळकेरी, पीएसआय राजू ममदापुर , सुषमा नंदीगोणा, कर्मचारी अनिल दोडमणी, राजू नायक, एस.पी. गड्याळ, जी.एच. मुल्ला, के.जे. राठोड, व्ही.एच. कडलीबालू, आर.एस. गोडे, बसवराज दिनी, प.पू. जमादार आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली. याप्रकरणी गांधीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: