कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी, शिरगाव, चिंचणी या गावातील बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस समर्थित संचालकांचा सत्कार व अभिनंदन केले.

चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी, शिरगाव व इंगळी गावातील विविध उद्देशांच्या प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थांवर, काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांनी बाजी मारली. तिन्ही पीकेपीएसमध्ये काँग्रेस समर्थित 8 आणि भाजप समर्थित 4 जणांची संचालक म्हणून निवड झाली आहे. शिरगाव येथील तम्मन्ना बेडर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गावातील सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अण्णासाबा जाधव, हुवण्णा चौघुले, राजाराम माने, सागर आवरादे सुभाष घोसरवाडे, तेजश्री माधबावे, रामजी कांबळे, अजितकुमार चिगरे, रमेश पवार, अण्णासाब चौघुले, लक्ष्मीबाई मिरजे, ज्योतिबा सावंत हे निवडून आले आहेत.

शिरगाव गावातील सहकारी संस्थेच्या निवडणुकीत बसवराज पवाडे, बाबागौडा पाटील, शंकर मलकापुरे, सलीम ताशिलदार , सदाशिव उदगट्टी, मीनाक्षी उदगट्टी, युसुफ माने, प्रसाद जोशी, संजय पुजारी, सावित्री बन्ने, रमेश चौघुले हे विजयी झाले आहेत.
चिंचणी गावच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कल्लाप्पा भोसले, जयश्री कुंभार , राजश्री मुद्दप्पगोळ, महादेव सनदी, सुनिल गुरव, अप्पासाबा चौगला, सुनील किल्लेदार , चंद्रकांत कमाने, श्रीधर अम्मनगी, बसवराज पाटील, लक्ष्मण गौडा पाटील, संजयकुमार परीट हे निवडून आले आहेत.


Recent Comments