Chikkodi

आंबेडकरांबद्दल अमित शहांचे वक्तव्य निषेधार्ह : अर्जुन नायकवडी

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकरांबद्दल हलके वक्तव्य केले आहे , त्यांनी माफी मागावी असे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष अर्जुन नायकवाडी म्हणाले .

चिक्कोडी पर्यटन मंदिरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आंबेडकरांनी संविधान बनवले नसते तर आज अमित शहा गृहमंत्री झाले नसते. परकीय देश आपली राज्यघटना पाहून संविधान बनवत आहेत. याचे प्रमुख कारण डॉ. बी.आर.आंबेडकर आहेत . अमित शहा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणी अर्जुन नायकवा डी यांनी केली.

Tags: