Chikkodi

विहिरीत पडलेल्या मांजराला जीवदान

Share

50 फूट खोल विहिरीत पडलेल्या मांजराला अग्निशमन दलाचे जवान आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात घडली.

चिक्कोडी जयनगर येथील भोजकर पवनराज माळी यांच्या बागेतील विहिरीत चुकून मांजर पडले होते . ते बाहेर पडण्यासाठी धडपडत होते . मांजराला वाचवण्याचे स्थानिकांचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे जवान आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांजराची सुटका केली.

अग्निशमन दल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांजराच्या सुटकेसाठी सुमारे तासभर मोहीम राबवली . शिडीच्या साहाय्याने विहिरीत उतरून मांजराला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

तसेच सुमारे 50 फूट खोल विहिरीत पडलेले मांजर जगण्यासाठी धडपडत होते . पाण्यात फार वेळ राहिल्याने , त्याच्यात त्राण उरले नव्हते . मात्र नंतर ते सावध झाल्यावर निघून गेले . एकंदरीत जीव धोक्यात घालून मांजर वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे

Tags: