Chikkodi

नवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ . प्रभाकर कोरेंनी लहान मुलांसोबत केले नृत्य

Share

मंगळवारी नवरात्रीनिमित्त चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावातील केएलई शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केएलई कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी मुलांसोबत नृत्य केले.

नवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवात खास सहभागी होऊन त्यांनी आजच्या तरुणांना दसरा उत्सवाची माहिती देण्याचे काम केले. तरुण मुलांमध्ये सहभागी होऊन, कोरे आजच्या तरुणांसाठी एक आदर्श बनले . कोरेंनी मुलांसोबत केलेल्या नृत्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. आजकाल अनेकांना राज्योत्सवात सहभागी होण्यासाठी वेळ नाही. पण ते या महोत्सवात सहभागी होणे हे विशेष .

Tags: