धारवाडमध्ये मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 हा रस्ता बंद झाला आहे.

पावसामुळे हुबळी, धारवाड बायपास रस्ता सुमारे तीन तास बंद होता. धारवाड येथील रम्या रेसिडेन्सीजवळ बायपास रोडवर अचानक पाणी आल्याने परिवहन बस पाण्यात अडकली आणि प्रवाशांची पळापळ झाली.

पाण्यात अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना धडपड करावी लागली. बसमधील तीस जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.


Recent Comments