धारवाडमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी भेट देऊन तपास केला.
हुबळी धारवाड शहर पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी धारवाडमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रध्वजाचा अपमान झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
धारवाड शहरातील सीबीटी बसस्थानकाजवळ काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, गांधी जयंतीच्या वेळी दलित समर्थक संघटनांनी येथे गांधी जयंती साजरी केली. काहींनी तिथे टिपू सुलतानाचे चित्र असणारा ध्वज फडकविला. हा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षाही उंचीवर फडकत होता. राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे लक्षात येताच मनपा कर्मचाऱ्यांना बोलावून सदर ध्वज हटविण्यात आला. दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.


Recent Comments