धारवाड येथील टिपू सुलतान सर्कलमध्ये टिपू सुलतानचे चित्र असणारा ध्वज फडकविण्यात आल्याच्या विरोधार्थ आज श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
धारवाडमध्ये महात्मा गांधी जयंतीदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला. हे कृत्य देशद्रोह्यांनी केले असून या घटनेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिस विभागाने राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना लाथ मारून आत टाकावे, बंगळुरूमध्ये देखील मुख्यमंत्र्यांसमोर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला.
अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित असूनही राष्ट्रध्वजाचा अवमान झाला, हि खेदजनक बाब आहे. देशद्रोहाच्या विरोधात कठोर कायदेशीर कलम नसल्यामुळे हे घडले आहे. सरकारने कठोर कलमांची अंमलबजावणी करावी असा आग्रह प्रमोद मुतालिक यांनी केला.


Recent Comments