Chikkodi

सरकारी सुविधांपासून वंचित असलेल्या रायबागमधील वृद्ध दाम्पत्याची परवड

Share

चिकोडीतील एका गरीब वृद्ध दाम्पत्याची सरकारी सुविधांअभावी परवड होत असून चिकोडीत वृद्ध महिलेला मारहाण केल्याची बाब समोर आली आहे.

राज्यात अनेकांच्या खात्यात हमी योजनांचा लाभ पोहोचला असून गोरगरीब आणि तळागाळातील अनेक नागरिक मात्र यापासून अद्याप वंचित असल्याची बाब समोर आली आहे. हमी योजनांच्या गर्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने गोरगरिबांचे हित विसरून सर्व आश्वासने हि केवळ घोषणांपुरतीच मर्यादित ठेवल्याचा आरोप केला जात आहे.

कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णा यांच्या मतदारसंघात सरकारी सुविधांपासून वंचित असलेल्या एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी आमदार तम्मण्णायांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे.

गृहलक्ष्मी योजनेचा लाभ खऱ्या गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही राजकीय नेते कठपुतळ्यासारखे वागत असल्याचे दिसून येत असून याचा प्रत्यय याठिकाणी आळा आहे. रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहरातील सदाशिव नगर येथील रहिवासी कल्लव्वा गनिगेर (६८) आणि ताय्यप्पा गनिगेर (७९) यांना रेशन कार्ड किंवा कोणतीही पेन्शन योजना किंवा गृहलक्ष्मी योजना मिळालेली नाही. या गरीब दाम्पत्याचे सरकारी सुविधांअभावी हाल होत असून याकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे.

Tags: