रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला मागून आलेल्या टीटी वाहनाने धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धारवाड तालुक्यातील तेगूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
दावणगेरेकडे जाणाऱ्या टीटी वाहनात एकूण 12 जण प्रवास करत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला टीटीची धडक बसली. धडकेने टीटी वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यामुळे चालक व चालकाच्या शेजारी बसलेली व्यक्ती असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी आणि इतर लॉरी चालकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना काल रात्री धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गरग पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला.


Recent Comments