MIRAJ

मिरज येथील सचिन हॉस्पिटलमध्ये उद्या रविवारी वंध्यत्व निवारण शिबीर

Share

मिरज येथील सचिन हॉस्पिटल मध्ये मूल न झालेल्या दाम्पत्यांसाठी वंध्यत्व निवारण आणि मार्गदर्शन शिबीर उद्या रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे . याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ . सचिन सचिन सुगाणावर यांनी केले आहे .

सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुल न झालेल्या दांपत्यांना व स्त्रियांमधील विविध आजारावर हॉस्पीटलच्यावतीने उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहोत, असे मत डॉ. सचिन सुगाणावर यांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हॉस्पीटलच्या वतीने राबविणेत
येणाऱ्या सामाजिक उपक्रमापैकी एक म्हणजे मोफत तपासणी शिबिर. शिबिरामध्ये मोफत तपासणी औषधे दिली जातील व शिबीरामधील पेशंटना आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया ह्या अत्यल्प दरामध्ये करण्यात येईल.

या शिबिराच्या माध्यमातून मूल न झालेल्या दांपत्यांच्या अर्थातच स्त्री व पुरुष यांचे दोषाविषयी मार्गदर्शन व टेस्ट ट्यूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी संखोल मार्गदर्शन केले जाईल. व विशेषतः (IUI) गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या केलेल्या शुक्राणूंचे रोपण, वीर्यपेढी, स्त्रीबीजदान, गर्भ गोठवून ठेवणे, IVF, ICSI, IMSI, व Vitrification याच बरोबर बंद गर्भनलिका चालू करणे, स्त्रीबिज तयार न होणे यावर मार्गदर्शन केले जाईल.

पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंमधील दोष, संख्या कमी असणे, ताकद (Motility) कमी असणे व हालचाल कमी असणे, शुक्राणू मृत असणे, लैगिंक समस्या यावर आधुनिक उपाचाराची व मॉयक्रोसर्जरीची माहिती दिली
जाईल. टेस्ट ट्यूब बेबी व (IUI) तंत्रज्ञानमध्ये अनेक प्रकार असतात. स्त्री व पुरुषामधील दोषानुरुप त्याचीउपचारपध्दती निवडावी लागते व त्या अनुषंगाने खर्च येत असतो.

स्त्री आरोग्यामध्ये पाळीच्या गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाला सूज, पांढरे जाणे, यावर गर्भाशय आजारावर दुर्बिणीद्वारा व तंत्रज्ञानाने आधुनिक उपचार करता येते. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या आजारावर आधुनिक मशिनचा वापर करुन लवकर निदान व उपचार करणाऱ्या तंत्राविषयी माहिती दिली जाईल, गर्भाशयाच्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रियेची गरज असल्यास आधुनिक पद्धतीने व कमी खर्चामध्ये करण्याची सोय उपलब्ध आहे.

आज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध टेस्ट ट्युब बेबीची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ञ डॉक्टरांची टीम असल्यामुळे वंध्यत्वातील उपचाराचा यशाचा आलेख जास्त आहे. म्हणजेच मूल होण्याचे प्रमाण अधिक आहे.
पुरुष व स्त्रीवंध्यत्व, लैगिंक समस्या व गुप्तरोग, शुक्राणु कमी असणे, अजिबात नसणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, इंद्रियांची समस्या, शीघ्रपतन, नपुंसकता, स्वप्नदोष, अनेक आजार मानसिक कारणाने व वयोमानानुसार आलेली कमजोरी, विवाहपुर्व व विवाहानंतरच्या समस्यांसाठी आधुनिक उपचार वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गजन्य व गुप्तरोगावर मार्गदर्शन व उपचाराची सोय.

सुरक्षित मातृत्व व सुदृढ बालक ही या रुग्णालयाचे वैशिष्ट्य आहे. विविध घटकांना आर्थिक कुवतीनुसार सुविधा व उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमधील औषधोपचार व टेस्ट ट्युब बेबी या तंत्रज्ञानाने अपत्य प्राप्तीचे भाग्य लाभले आहे. याचे समाधान डॉक्टरांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन सचिन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: