Chikkodi

ट्रॅक्टरमधून पडून तरुणाचा मृत्यू

Share

ट्रॅक्टरमधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील मानकापुर गावात घडली आहे.

सूरज शेवाळे (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री गणेश विसर्जन पाहून तो मित्रांसह ट्रॅक्टरमधून मानकापुर गावात जात असताना हि घटना घडली. ट्रॅक्टरमधून अचानक त्याचा तोल गेला आणि ट्रॅक्टरवरून खाली पडून तो गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराअभावी या तरुणाचा मृत्यू झाला. सदलगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags: