राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊन दंगलीच्या बातम्या येत असताना, धारवाडमधील सत्तूर येथील मुस्लीम बांधवांनी मात्र समाजासमोर आदर्श निम्रान केला आहे. ईद ए मिलाद सणाच्या मिरवणुकीत गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशाची विशेष पूजा करून भावपूर्ण निरोप दिला.
धारवाड तालुक्यातील सत्तूर गावातील पोस्ट ऑफिस कचेरीजवळ ग्रामपरिषदेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून या मूर्तीचे पूजन येथील मुस्लिम बांधवांनी केले आहे. ईद ए मिलाद या मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधवांनी येथील गणेश मंडपात गणेशाची विधिवत पूजा करून एकतेचा संदेश दिला.


Recent Comments