Chikkodi

धार्मिक कार्यक्रमांबरोबरच युवकांनी समाजसेवेतही सहभागी व्हावे : महांतेश कवठगीमठ

Share

धार्मिक कार्यक्रमांबरोबरच युवकांनी समाजसेवेतही सहभागी व्हावे असे आवाहन विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले आहे. चिक्कोडी येथील श्री नवयुग गजानन मंडळ प्रभुवाडी येथील गणेशोत्सव मंडळाच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमान्य टिळकांनी समाज संघटित व्हावा या उद्देशाने सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा युवकांनी एकात्मतेने तसेच धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सवाचे आज भव्य रूपात आयोजन केले जात आहे. आजची तरुण पिढी फटाके, डॉल्बी, मिरवणुकीत हिडीस नृत्य करून हा उत्सव साजरा करत आहेत. मात्र सार्वजनिक मंडळाने सामाजिक उपक्रम राबवून उत्सवाचा मूळ उद्देश जपावा असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी स्वामीजींची उपस्थिती होती. नगरपालिकेचे माजी अध्यक्ष रामा माने, मनपा अध्यक्ष राजू संकेश्वरी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपालिका उपाध्यक्ष इरफान बेपारी, जगदीश कवटगीमठ, संजय कवटगीमठ, आदिनाथ शेट्टी, अनिल माने, वर्धमान सदलगे, आनंद आरवारे, रणजित शिंदे, मनपा उपाध्यक्ष नागेश नाईक, अनिल मोरे, बी. आर. यादव, ज्योतिबा कामकर, शिवू ठाणेकर, प्रवीण माने, महादेव भोसले, सिद्धेश्वर पाटील, संतोष ऐवळे, प्रवीण निकम, निवृत्ती माने, शिवानंद मठद, वैभव माने, नितीन माने, सुरज पवार, रूपा यादव, लता कामकर, रंजना कदम आदी उपस्थित होते.

Tags: