Chikkodi

निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघात : मृतांची संख्या ४ वर

Share

कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात रविवारी भीषण अपघात घडला असून या अपघातात बेळगावहून कोल्हापूरला निघालेल्या कंटेनरनं तब्बल 7 वाहनांना धडक दिली. या अपघातातील मृतांचा आकडा ४ वर जाऊन पोहोचला आहे.

या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले होते तर, 6 जण गंभीर जखमी होते. हा अपघात इतका भीषण होता की यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली तामिळनाडूस्थित ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने वेगावरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात संतोष माने (४५), रेखा गाडीवड्डरा (३५), राहणार निपाणी, जबीन मकानदार (५८) आणि दिलदार मुल्ला (६१) यांचा मृत्यू झाला आहे. अन्य जखमी रुग्णांवर मिरज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद व निपाणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Tags: