Chikkodi

वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात एसडीपीआयचे आंदोलन

Share

‘वक्फ दुरुस्ती विधेयक 2024’ नाकारण्याची मागणी करत स्थानिक मुस्लिमांसह एसडीपीआय संघटनेच्या सदस्यांनी चिक्कोडी शहरात निदर्शने केली.

वक्फ बचाव आंदोलनाचा एक भाग म्हणून वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 च्या विरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या चिक्कोडी जिल्हा समितीच्या वतीने शहरातील अंकली खुंट येथील एसडीपीआय कार्यालय ते बसव सर्कल पर्यंत निदर्शने करण्यात आली व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला .

यावेळी जिल्हा सरचिटणीस मुल्लाणी, जिल्हा सहसचिव झाकीर नायकवाडी, चिक्कोडी विधानसभा अध्यक्ष तबरेज शेख, सचिव राजेखान मोकाशी, जुबेर खानभाई , आदिल मुल्ला, नदीम नदाफ, वसीम पटेल व सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags: