Dharwad

धारवाडच्या लक्कमनहल्ली ओणीत कैलास गणपतीची प्रतिष्ठापना

Share

धारवाड येथील लक्कमनहळ्ळी ओणी येथे गेल्या २८ वर्षांपासून गणेशोत्सवात अविरतपणे विराजमान होत असलेल्या विघ्नहर्त्याची मूर्ती , यंदा भगवान शंकराच्या रूपात विराजमान करण्यात आली आणि या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

धारवाड शहरातील होसा यल्लापूर लक्कमनहळ्ळी ओणी येथील गजानन युवक मंडळाचे सदस्य दरवर्षी गणेशमूर्तीची विशेष प्रतिष्ठापना करत असून, सध्याच्या २९ व्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भगवान शंकराची मूर्ती सजवण्यात आली आहे. कैलासात विराजमान झालेलय शिवाच्या रूपात यंदा गणेश मूर्तीचे रूप आहे .

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी कैलासात विराजमान झालेल्या विघ्ननिवारकाचे विराजमान रूप पाहून गणेश भक्तांनी आनंद व्यक्त केला तसेच गजानन मंडळाला शुभेच्छा दिल्या.

Tags: