Dharwad

हुबळी – धारवाड बायपास टोल फ्री : 7 सप्टेंबरपासून टोलवसुली पूर्ण स्थगित

Share

हुबळी-धारवाड बायपासवर टोल भरून थकलेल्या वाहनधारकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अजून किती वर्षे हुबळी – धारवाड बायपास रोडवरील प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत असतानाच येथील वाहनधारकांना आता आनंदाची बातमी मिळाली आहे.

नंदी हायवे डेव्हलपर्स लिमिटेड, ज्यांच्याकडे हुबळी – धारवाड बायपास रस्त्यांची देखभाल आणि रस्ता वापरकर्ता शुल्क (टोल) वसूल करण्याचा करार होता, त्यांचा करार कालबाह्य झाल्यामुळे 7 सप्टेंबरपासून टोल वसुली थांबणार आहे. 1998 पासून या बायपासचे सुरु असलेले बायपास देखभाल व टोलवसुलीचे काम बंद करण्यात येणार आहे.

टोलवसुलीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक शिवकुमार खेणी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक परिपत्रक जारी केले असून, 7 सप्टेंबरपासून रस्ता वापरकर्ता शुल्क पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Tags: