तरुण वर्गासह हिंदू धर्मियांकडून मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धारवाडमधील पोलीस अधिकाऱ्यांनी डीजे ऑपरेटर आणि मालकांची बैठक घेऊन सूचना दिल्या.
शहरातील , उपनगर पोलिस स्टेशनच्या सभा भवनात तीन पोलिस ठाण्याच्या व्याप्तीतील डीजे ऑपरेटर आणि मालकांची बैठक झाली. धारवाडचे एसीपी प्रशांत सिध्दन गौडर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली असून बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी डीजे चालक व मालकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
बैठकीत एसीपी प्रशांत म्हणाले की, कायद्यानुसार तुम्ही तुमचा डीजे भाड्याने द्या मात्र रुग्णालये, शासकीय कार्यालये, मंदिरे, मशीद, चर्च यांच्याजवळ कायद्यानुसार डीजेचा आवाज बंद करावा. अन्यथा डीजे जप्त करून कायदेशीर चौकटीच्या पलीकडे जाऊन कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


Recent Comments