कित्तूर नगरपंचायत सदस्य नागराज असुंडी यांच्या अपहरणाचा निषेध करत बेळगाव जिल्हा भाजप युनिटतर्फे निषेध करण्यात आला.
व्हॉइस ओव्हर : कित्तूर नगर पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका सदस्याचे रात्री अपहरण करण्यात आल्याने बेळगाव जिल्हा भाजप युनिटतर्फे , बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी भाजपचे गटनेते धनंजय जाधव यांनी कित्तूर नगरपंचायतीतील पराभवाच्या भीतीने नागराज असुंडीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगून आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी केली . बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद यांना नागराज असुंडी चा लवकरात लवकर शोध घेण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बेळगाव ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले की, कित्तूर नगरपंचायत निवडणुकीला सामोरे न जाता काँग्रेसने नागराज असुंडीचे अपहरण केले असून, नागराजच्या वडिलांनी काल रात्री दिलेल्या फिर्यादीत आरोपीचे नाव असून त्यांना लवकरात लवकर अटक करावी , अशी मागणी केली.
निवेदन स्वीकारून बोलताना एसपी भीमाशंकर गुळेद यांनी , नागराज असुंडीचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात येईल, अशी माहिती दिली.
यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments