Dharwad

इस्कॉन, धारवाड मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Share

हिंदू उत्सवांपैकी एक असणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे,धरवाडमधील इस्कॉन मंदिरात देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला.

हुबळी धारवाड मुख्य मार्गावरील रायपूरजवळील इस्कॉन मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विशेष पूजेसह कृष्ण भजन करण्यात आले. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. रांगेत उभं राहून भाविकांनी विशेष पूजा करून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक भाविकांनी आपल्या मुलांना श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आणले होते. यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले जात होते. इस्कॉन मंदिरातर्फे आयोजिण्यात आलेल्या भजन कार्यक्रमात अनेक भाविकांनी सहभाग घेतला.

Tags: