Dharwad

सार्वजनिक ठिकाणी दुचाकी स्टंट करणाऱ्या तरुण तरुणीवर कारवाई :२ केईएम बाईक जप्त

Share

धारवाड वाहतूक पोलिसांनी , सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दुचाकीने स्टंट करीत सार्वजनिकांना धोका निर्माण केल्याप्रकरणी , दोन केईएम बाईक जप्त केल्या असून , दुचाकी चालवणाऱ्या तरुण तरुणीला चांगली अद्दल घडवली .

गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक विभागाचे डीसीपी रविश यांनी वाहतूक निरीक्षकांना दुचाकीचालकांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर धारवाड वाहतूक पोलिस निरीक्षक श्रीनिवास मेटी यांनी धारवाडमध्ये दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या तरुणी व तरुणाची दुचाकी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

राणेबेन्नूर येथील तरुणी सुजाता KTM 250 वर स्टंट करीत होती, तर धारवाड येथील 21 वर्षीय प्रज्वल हा केटीएम 350 बाईकवरून सार्वजनिक ठिकाणी स्टंट करीत होता . व्हिडिओ पाहिल्यानंतर निरीक्षक श्रीनिवास मेटी यांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. या दोघांविरुद्ध धारवाड वाहतूक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Tags: