नवलगुंद येथे खाण आणि भूविज्ञान विभागाची परवानगी न घेता नवलगुंद ऐतिहासिक टेकडीवर बेकायदेशीर रित्या खोदकाम करून येथील 3000 हून अधिक ट्रक मातीची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याचा आरोप माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी केला आहे.
नवलगुंद शहरातील गेस्टहाऊसच्या सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, मतदार संघातील ऐतिहासिक टेकडीचे उत्खनन बेकायदेशीर असून कामाच्या पारदर्शक नियमांचे पालन न करता चक्कडी रस्ता तयार करण्यात आला आहे. याप्रकरणी शासनाने योग्य चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. एखादे काम सुरू करायचे असेल, तर संबंधित विभागाकडून निधी दिला जातो, त्याबाबतची नोंद देखील ठेवली जाते, या कामकाजाची सर्व माहिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Recent Comments