मुडामध्ये मिळवलेल्या साइट्स बेकायदेशीर आहेत, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी केली आहे.
धारवाड येथील नवलगुंद येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवरील खटला चालविण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. कायदेशीर तपासाअंती ते निर्दोष सिद्ध झाल्यास त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यात आमची काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री हे स्वतः एक वकील आहेत. त्यांना कायद्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन तपासात सहकार्य करावे, अशी मागणी शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी केली.


Recent Comments