कागवड तालुक्यातील दोन नगर पंचायती व एका नगरपालिकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे, असे कागवाडचे तहसीलदार तथा प्रशासकीय अधिकारी राजेश बुर्ली यांनी सांगितले.

शुक्रवारी इन न्यूज शी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा आदेश जारी केला असून यानुसार ऐनापूर नगरपंचायतीचे अध्यक्षपद मागासवर्गीय महिला अ वर्ग, उपाध्यक्षपद अनुसूचित जाती वर्गाकरिता राखीव आहे.तर शेडबाळ नगरपंचायतीचे अध्यक्षपद सर्वसाधारण तर उपाध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. उगारा खुर्द नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण मागासवर्गीय अ वर्ग महिलेसाठी, तर उपाध्यक्षपद सर्वसाधारणसाठी जाहीर झाले आहे.
ऐनापूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बुधवार दि २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर
उगार खुर्द नगरपालिकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार दि २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. शेडाबाळ नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवार दि २७ ऑगस्ट रोजी होणार आहे.


Recent Comments