Vijayapura

विजयपूर : वकील हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक

Share

विजयपूर मध्ये वकिलाच्या अपघाताचा बनाव रचून हत्या करण्यात आल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून याप्रकरणी अन्य आरोपींचा शोध जारी करण्यात आला आहे.

विजयपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात कार खाली सापडलेल्या वकिलाला दोन किलोमीटर पर्यंत फरफटत घेऊन जाण्यात आले. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला तरी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहता सदर कारला नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी आणि तपास करत हा अपघात नसून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आणले आहे..

वाजता एक भीषण रस्ता अपघात झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले दृश्य पाहता काळजाचा ठोका चुकला. अपघाताचे दृश्य पाहून पोलीसही क्षणभर हादरले. कोर्ट रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळून वकील रवी मालीनकेरी उर्फ रवी आगरखेड यांना खेचून आणणाऱ्या इनोव्हा कारने त्यांना विजयपूर नगर येथील जिल्हा पंचायत रोडवर फरफटत आणले. स्मशानभूमीजवळ रस्त्याच्या मधोमध रवी मालिनकेरी मृतावस्थेत आढळून आले. हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी प्रकरणाचा तपास घेतला. यावेळी हा अपघात नसून,

पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, फरार असलेल्या इतरांचा शोध घेण्यासाठी जाळे टाकले आहे. तुलसीराम हरिजन, ॲलेक्स गोल्लार, षणमुख नडूवेनकेरी, प्रकाश गोल्लार, मुरुगेश उळागड्डी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्वजण रोजंदारी मजूर असून सर्वांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या सर्वांवर जिल्ह्य़ातील विविध ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जीवाला धोका असे गुन्हे दाखल आहेत.

घटनेच्या आधी २० दिवसांपूर्वी, रवी मालिनकेरी यांनी अलेक्सचे अपहरण करून तुलसीराम याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे आपण आपला मित्र ॲलेक्स गोल्लार, प्रकाश गोल्लार, षणमुख नडूवेनकेरी, जुमनाळ येथील सद्दाम, मुरुगेश उळागड्डी, अमीना शेख यांच्यासमवेत रवी मालिनकेरी यांना मारण्याचा कट रचला. ८ ऑगस्ट रोजी आनंद अतालट्टी यांनी सद्दामकडे गहाण ठेवलेली इनोव्हा कार पळवली. पॉलिटेक्निक वसतिगृहासमोर स्कूटीवरून जात असताना वकील मालिनकेरी यांना पाठीमागून धक्का मारण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. हत्येच्या वेळी ॲलेक्स, षणमुख आणि सद्दाम त्या कारमध्ये होते आणि ॲलेक्स कार चालवत होता, असे तपासात समोर आले आहे.

एका पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून चारच दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

Tags: