Chikkodi

महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून पाण्याची आवक बंद

Share

महाराष्ट्रातील घाट भागात पाऊस कमी झाल्याने कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला असून महाराष्ट्र कोयना जलाशयातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

कोयना जलाशयात पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले असून, कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 52 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना जलाशयातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग वीज निर्मितीसाठी करण्यात येत असून कृष्णा नदीची आवक 105 टीएमसी वरून 86 टीएमसी वर आली आहे. कृष्ण नदीत होणारा विसर्ग घटून 2 लाख 50 हजार क्युसेक झाला आहे.

Tags: