मालमत्तेच्या वादातून विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरात एका महिलेला आणि वृद्धाला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुद्देबिहाळ शहरातील वीरेश नगरमध्ये ही अमानुष घटना घडली. देवम्मा लोटगेरी आणि सन्नहनुमंत लोटगेरी यांना त्यांच्या नातेवाईकांनी अमानुषपणे मारहाण केली.
एका व्यक्तीने देवम्माचे केस पकडून तिला फरफट नेले , तर दुसरा व्यक्ती वृद्ध हनुमंताला खाली पाडताना आणि त्याच्या छातीवर बसून त्याला मारहाण करताना दिसत आहे. हनुमंताचे नातेवाईक अमरप्पा कोरी आणि इराप्पा कोरी यांनी या दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. ह्या मारहाणीचा व्हिडीओ आता वायरल होत आहे .
सन्नहनुमंत आणि कोरी कुटुंबीयांमध्ये मालमत्तेचा वाद असून, याच मुद्द्यावरून झालेल्या भांडणात कोरी कुटुंबीयांनी लोटगेरी कुटुंबातील वृद्धांवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात देवम्मा आणि हनुमंत हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बागलकोट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुद्देबिहाळ शहरातील या अमानुष कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी जनतेने केली आहे.


Recent Comments