चालत्या बसमधून विद्यार्थी पडून जखमी झाल्याची घटना सिंदगी तालुक्यातील बन्नहट्टी पीए गावात घडली. सरकारी बसने हा विद्यार्थी शाळेत जात असताना हा अपघात झाला. संदीप शिवाप्पा गिड्डनगोळ असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.
सिंदगी शहरातील एचजी हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी संदीप बसच्या मागच्या चाकाला धडकून जखमी झाला. त्याला तातडीने सिंदगी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी बन्नीहट्टी पीए आणि सिंदगी रोडवर रास्ता रोको केले . सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.


Recent Comments