Chikkodi

येडूर गावाच्या नदीकाठावर एनडीआरएफचे पथक तैनात

Share

पूरस्थितीमुळे कृष्णा नदीकाठच्या भागात बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
येडूर गावाच्या नदीकाठावर एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे एक पथक नदीकाठावर पोहोचले आहे.
एनडीआरएफच्या टीमसोबत आमदार गणेश हुक्केरी यांनी पूरस्थितीची पाहणी केली . त्यानंतर आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की, जिल्हा प्रशासन पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनासह त्यांच्या स्वतःच्या 11 बोटी लोकांना बाहेर काढण्यासाठी तैनात ठेवल्या आहेत.

Tags: