Belagavi

संततधार पावसामुळे काकती येथे कोसळले घर

Share

बेळगावमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काकतीमधील शास्त्री रोड फर्स्ट क्रॉस येथील एक घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे घर शांता मल्लाप्पा सुरेकर यांच्या मालकीचे होते .

पावसामुळे घर कोसळल्यामुळे सुरेकर कुटुंबीयांनी काकती तलाठी व ग्रामपंचायतीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान घर कोसळल्याची माहिती मिळताच ग्रा. पं. सदस्य गजानन गव्हाणे यांनी शास्त्री रोड फर्स्ट क्रॉस येथे जाऊन घराची पाहणी केली. तसेच शांता सुरेकर यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Tags: