Banglore

अश्वथ नारायण भ्रष्टाचाराचे पितामह! मुख्यमंत्र्यांचा पलटवार!

Share

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री अश्वथ नारायण यांच्यासह भाजपचे सर्व नेते उभं राहून सरकारवर तुटून पडले.

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याच्या मुद्द्यावरूनच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. वाल्मिकी महामंडळात १०० टक्के भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी उभे राहून सरकारवर हल्लाबोल केला.(फ्लो)

विरोधकांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामयांनी उभं राहून भ्रष्टाचाराचे जनक तुम्ही आहेत? तुम्हाला याची लाज वाटते का? तुमच्या भोवी निगम घोटाळा, एपीएमसीसह अनेक घोटाळे झाले. हे सर्व घोटाळे सभागृहात उघड होतील, असा टोला लगावत भ्रष्टाचाराचे जनकच तुम्ही आहात अशा शब्दात पलटवार केला.

यावेळी आम. दिनेश गुंडूराव यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर देत माजी मुख्यमंत्री अश्वथ नारायण यांना टोला लंगवाल.या एक माजी उपमुख्यमंत्री असूनही त्यांना सभागृहात कसे बोलावे हे कळत नाही.. ते सभागृह चालू देत नाहीत. सरकार कसे चालवायचे ते आम्ही तुमच्याकडून शिकावे का? असा सवालही उपस्थित केला.

भ्रष्टाचार झालाय हे तुम्ही मान्य केले, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षाचे अश्वथ नारायण यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे मुख्यमंत्री हे १०० टक्के घोटाळ्याचे मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात त्यांनी निषेधही नोंदविला.

Tags: