दुभाजकाला कार धडकल्याने धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून विजयपूर मधील बसवणबागेवाडी मार्गावर हि घटना घडली आहे.
मल्लू डोलगोंड (32) आणि परशु मिनजीगी (26) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी इंगळेश्वर मार्गावर दुभाजकाला स्विफ्ट कारची धडक बसली. कारमधून पाचजण प्रवास करत होते.
अपघातात जागीच दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जखमींवर विजयपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेची नोंद बसवनबागेवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


Recent Comments