शहरातील डेंग्यू व मलेरिया यासारखे साथीचे आजार रोखण्यासाठी महानगरपालिकेला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन बेळगाव मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे.
आधीच डेंग्यू, मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकाही खबरदारीचे उपाय अवलंबत आहे. स्वच्छ भारत मिशन कचरा वाहू वाहनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शहरातील 58 वॉर्डांमध्ये फॉगिंग करण्यात येत आहे. नाल्यालगतच्या संवेदनशील भागात फॉगिंगला अधिक महत्त्व दिले जात आहे. स्वच्छतेला प्राधान्य न देणारी रस्त्यालगतच्या दुकानांवर पालिकेने कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ही सर्व खबरदारी घेणाऱ्या महानगरपालिकेसोबत जनतेनेही सहकार्य करणे गरजेचे आहे. जनतेचे कर्तव्य ओळखून लोकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, अशी विनंती पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली आहे.
डेंग्यू – मलेरियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा आपली जबाबदारी पार पाडत असून, मनपासोबत जनतेनेही पुढाकार घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments