खानापूर येथील तहसीलदार कार्यालयात निवडणूक कामांशी संबंधित आयोजित बैठकीत तहसीलदार आणि पंचायत विकास अधिकारी यांच्यात तीव्र वाद झाल्याची घटना समोर आली आहे.


बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आणि शंका विचारल्यामुळे तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना उद्दामपणाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. “कोणीही प्रश्न विचारायचे नाहीत, आम्ही सांगू तेवढेच ऐकायचे,” अशा शब्दांत तहसीलदारांनी आपला अधिकारदोष दाखवल्याचे समोर आले आहे.

या हुकूमशाही वृत्तीला पीडीओ अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असता, तहसीलदारांनी पदाची प्रतिष्ठा विसरून बैठकीतील कर्मचाऱ्यांना अत्यंत अवाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निवेदनात केला आहे. या असभ्य वर्तनाचा निषेध करत सर्व कर्मचाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या संबंधित तहसीलदारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व पीडीओ अधिकारी प्रक्रियेवर बहिष्कार टाकतील, असा इशारा कर्नाटक राज्य पंचायत विकास अधिकारी ‘बी’ ग्रेड संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे.


Recent Comments