जर मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कोणतीही भूमिका नसेल, तर सरकारचे नुकसान होण्याचे कोणतेही कारण नाही. आरोप ऐकल्यावर राग येणे स्वाभाविक आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या विधानाला सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस पक्षात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची वाट पाहणाऱ्यांनीच मुडा घोटाळा केला आहे असे विधान केंद्रीय मंत्री एच.डी. त्यांनी कुमारस्वामींनी केले होते. त्यांच्या या विधानाला बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिकिया देताना जारकीहोळींनी प्रत्त्युत्तर दिले असून मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. भाजप सरकार सत्तेवर असताना मुडा घोटाळा झाला असून यामध्ये सिद्धरामय्यांची कोणतीही भूमिका नाही. मुख्यमंत्र्यांचेच ६८ कोटी रुपये मुडाकडे थकले आहेत, असा दावा करत आरोप झाल्यावर राग येणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया देखील सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
जनता दर्शनमध्ये येण्यासाठी अधिकाऱ्यांना रोखण्यात आल्याच्या कुमारस्वामींच्या आरोपावरदेखील मंत्री जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली असून कुमारस्वामी हे एक खासदार असून अधिकाऱ्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, यामध्ये राजकारण किंवा वैयक्तिक द्वेष आणू नये, असे विधान जारकीहोळींनी केले.


Recent Comments