Uncategorized

बदलीमध्ये अन्याय : हेड कॉन्स्टेबल्सकडून कार्यालयासमोर निदर्शने

Share

विजयपूर नगरच्या एसपी कार्यालयासमोर हेड कॉन्स्टेबलने बदलीमध्ये अन्याय करण्यात आल्याच्या विरोधार्थ पोलीस स्थानकाच्या कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. बदली प्रकरणात एसपींनी अन्याय केल्याचा आरोप करत हेड कॉन्स्टेबल शंकरप्पा एस देसाई आंदोलन छेडत आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली.

विजयपुरा जिल्ह्यातील आलमेल शहराच्या पोलीस ठाण्यात देसाई हे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. हेडकॉन्स्टेबल म्हणून गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या देसाईंची पत्नी पुष्पा बेकवाड – देसाई यादेखील विजयपूर आरबीमध्ये कार्यरत आहेत. विजयपूरहून ८० किलोमीटर दूर येऊन ते सेवा बजावत आहेत. विजयपूरमधील दक्षता विभागात आपली बदली करण्याची विनंती आपण केली होती. मात्र विजयपूरमधील एसपी कार्यालयात सध्या आपण कार्यरत आहे.

आपल्या ऐवजी सुजाता चनगौडा यांची त्या जागेवर बदली करण्याचे आदेश देण्यात आले असून सुजाता चनगौडा यांच्या जागेवर आपली बदली झाली आहे. मी माझ्या कुटुंबासमवेत गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावत असून माझ्यावर अन्याय झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्यावर अन्याय झाला असून आपल्याला न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलन कायम ठेवणार, असा इशारा त्यांनी दिला.

Tags: