प्रज्वल रेवण्णा भारतात परत येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्याला अटक करण्यासाठी एसआयटी सज्ज असल्याची माहिती गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली.
बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, प्रज्वल रेवाण्णाला विमानतळावरून अटक करण्यासाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याची कायदेशीर चौकशी होईल. प्रज्वल परत येणार यासाठी एसआयटीने सर्वती तयारी केली असून परदेशात जाऊन अटक करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
परदेशात जाऊन प्रज्वल रेवण्णाला अटक करणे हे केंद्र सरकारच्या नियमात देखील बसत नाही. त्यामुळे परदेशात कुणालाही पाठवून प्रज्वल रेवाण्णाला अटक करणे अशक्य आहे. कायदेशीररित्या वॉरंट जारी करण्यात आले असून विमानतळावरूनच प्रज्वल रेवाण्णाला अटक होईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
प्रज्वल रेवण्णाचा पासपोर्ट र्राद्द करण्यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरु असून हि प्रक्रिया थोडी संथ सुरु आहे. प्रज्वलचा पासपोर्ट आता रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून प्रज्वल प्रकरणाचा निवडणुकीच्या निकालावर कोणता परिणाम होईल कि नाही याबाबत आपण काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली.


Recent Comments