Banglore

बेंगळुरूमध्ये मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने दुचाकीस्वाराला ठोकरले

Share

बेंगळुरूमधील मल्लेश्वरम येथील रहदारी पोलिस ठाण्याच्या परिसरात एका मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे.

मल्लेश्वरम रहदारी पोलिस ठाण्याच्या परिसरात मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने विनय नामक ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून तो सुब्रमण्यम नगर येथील रहिवासी आहे. कारचालक हरिनाथला मल्लेश्वरम वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दारूच्या नशेत गाडी चालवत असलेल्या हरिनाथ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटोला धडकला. त्यानंतर विनय आणि त्याचा मित्र ज्या बाईकवर चालले होते त्या दुचाकीला कारची धडक बसली. जमिनीवर जोराने आपटल्याने विनय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघात घडल्यानंतर कारचालक वाहनातून खाली आला नाही त्यामुळे रहदारी पोलिसांनी त्याला कारबाहेर काढून ताब्यात घेतले. या घटनेत एका रिक्षाचेही नुकसान झाले आहे. मल्लेश्वरम पोलिसांनी कार आणि दुचाकी दोन्ही ताब्यात घेतले आहे.

Tags: