माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना बंगळूरच्या ४२ व्या एसीएमएम न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
हासन होळेपुर येथील महिलेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना बंगळूरच्या ४२ व्या एसीएमएम न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जे. प्रीत यांनी रेवण्णा यांना जामीन मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात आरोपी रेवण्णाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यासंदर्भातील खटला आता न्यायालयात पूर्ण झाला असून न्यायालयाने रेवण्णा यांना अटींसह जामीन मंजूर केला आहे.
ज्येष्ठ वकील सी. व्ही. नागेश यांनी रेवण्णाची बाजू मांडली, तर एसआयटीतर्फे एसपीपी जोयना कोठारी यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी के.आर. नगर पीडितेच्या अपहरण प्रकरणातही रेवण्णाला जामीन मिळाला होता.


Recent Comments