तरुणीला दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसवून धोकादायक स्टंट्स करणाऱ्या तरुणाला हेब्बाळ पोलिसांनी अटक केली आहे.
कावल बैरसंद्रयेथील एम. वी. लेआऊट येथील रहिवासी सिलंबरसण (वय २१) असे दुचाकीवरून प्रताप करणाऱ्या तरुणाचे नावे आहे. बेंगळुरू-बळ्ळारी मार्गावरून हेब्बाळच्या दिशेने जाणाऱ्या या दुचाकीवीराने पेट्रोलच्या टाकीवर तरुणीला बसवून धोकादायक पद्धतीने स्टंट्स सुरु ठेवले होते. यावेळी दुचाकीच्या मागून येणाऱ्या कारचालकाने सदर प्रकारचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल झाला.
व्हिडीओ पाहून हेब्बाळरहदारी पोलिसांनी दुचाकीची माहिती काढत सिलंबरसण याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या स्टंटवीरावर गुन्हा दाखल करण्यासहीत वाहन परवाना रद्द करण्याची शिफारस वाहतूक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाहन चालविताना जनतेच्या शांताताईचा भंग करणे, वाहतुकीच्या नियमांबद्दल बेपर्वाई केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्तर वाहतूक विभागाचे डीसीपी डी. आर. सिरीगौरी यांनी दिला आहे.


Recent Comments