Banglore

देवराजगौडांचं डोकं फिरलं : माझ्या नावाचा गैरवापर : डीकेशींचा पलटवार

Share

 

 

देवराजगौडा यांचं डोकं फिरलंय त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. ते मानसिक झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे, माझ्या नावाचा गैरवापर ते करत असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले.

बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना डी.के. शिवकुमार म्हणाले की देवराजगौडा यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही. पार्टी दरम्यान हजारो लोक एकमेकांना भेटायला जातात. कोणता साप कोणत्या बिळात आहे हे मी कसे सांगू शकेन असा टोलाही डीकेशींनी लगावला.()

मी 100 कोटी देऊ केले तर लोकायुक्तांकडे जाऊन तक्रार करा, असे आव्हान डीकेशींनी देवराजगौडा यांना दिले आहे. प्रत्येकजण पेन ड्राइव्हबद्दल बोलत आहे. मात्र पीडितांबद्दल कोणी का बोलत नाही? असा सवालही डीकेशींनी उपस्थित केला.

Tags: