Uncategorized

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Share

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील चिक्कबेवनूर गावात उघडकीस आली आहे.

सोहेल होनमरगी या युवकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून महाराष्ट्रात घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. १३ मे पासून १७ मे पर्यंत संशयित आरोपी सोहेल फरारी होता. त्याच्याविरोधात कलम ३६६, ३७६(२) आय, आयपीसी ४ , ६, १२ पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाले आहे.

Tags: