खासदार प्रज्वल रेवण्णा पेनड्राइव्ह प्रकरणी ऍड. देवराजगौड यांनी नवा गौप्य्स्फोट करत पेनड्राइव्ह डी. के. शिवकुमारांनीच तयार केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ऍड. देवराजगौड यांच्या या विधानानंतर प्रज्वल रेवण्णा प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
डी.के.शिवकुमार यांनी आपल्याला बोलावून एच. डी. कुमारस्वामी यांचे नाव पेनड्राइव्ह प्रकरणी पुढे करण्याची सूचना दिली. पेनड्राइव्ह कुमारस्वामी यांनी वाटले असे सांगून यासंदर्भात तुम्ही अडचणीत येणार नाही, अशी ग्वाही देखील दिल्याचे ऍड. देवराजगौड यांनी सांगितले आहे.
याप्रकरणी आपल्याला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली. कार्तिकला बोलावून संपूर्ण माहिती घेऊन पेनड्राइव्ह तयार करण्यात आले. डी. के. शिवकुमारांनी चार मंत्र्यांची कमिटी केली असून यामध्ये चेलुवीरायस्वामी, कृष्णाभैरेगौडा, प्रियांक खर्गे आणि आणखी एका मंत्र्यांचा समावेश असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. चार मंत्र्यांच्या टीमच्या सहकार्याने हे प्रकरण पुढे आणण्यात आले असून यासाठी आपल्याला १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती. यापैकी ५ कोटी ऍडव्हान्स देण्यात आले असून हि रक्कम बौरिंग क्लबच्या रूम नं. ११० मध्ये देण्यात आल्याचेही ऍड. देवराजगौडा यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर हि ऑफर आपण मान्य न केल्याने नरेंद्र मोदी, भाजप आणि कुमारस्वामींना बदनाम करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
चन्नरायपट्टण गोपालस्वामी यांना वाटाघाटीसाठी पाच कोटी रुपये घेऊन पाठविण्यात आले होते. याप्रकरणी नरेंद्र मोदींना कलंकित करण्यासाठी, तसेच भाजपचे नाव बदनाम करण्यासाठी डीकेशींनी रचलेला हा डाव होता. कुमारस्वामी यांचे नेतृत्व राज्यात नष्ट करणे हा डी. के. शिवकुमार यांचा मुख्य उद्देश होता, असा दावा देवराजगौड यांनी केला आहे.


Recent Comments