गणेशपूर भागातील एका रहिवासी कॉलनीमध्ये विकासाच्या नावाखाली छान वाढलेली झाडांची कत्तल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

गणेशपुरातील एमईएस कॉलनीमधील खुल्या जागेत काही वर्षांपूर्वी कॉलनीतील दानशूर लोकांच्या सहभागातून लहानसे गणेश मंदिर उभारण्यात आले आहे. सदर जागेचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याने लोकप्रतिनिधींच्या मदतीने निवडणुकीच्या तोंडावर सदर जागेच्या विकासाचा नारळ फोडण्यात आला. या मंदिर परिसराला तटबंदी आणि सोबत आतमध्ये बसण्याचे बाक आणि उद्यान अश्या संकल्पनेत विकास आराखडा राबविण्याची तयारी सुरू असताना एका स्थानिक नागरिकाच्या हट्टी भूमिकेमुळे या ठिकाणी लावण्यात आलेली अनेक झाडे तोडण्यात आली.

या जागेच्या सभोवती राहणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी सुरवातीला जी झाडे लावली होती, त्यांची आज चांगली वाढ होऊन मोठ्या वृक्ष्यात रूपांतरित झाली असताना कोणतेही कारण नसताना फक्त एका हेखेखोर माणसाच्या वृत्तीमुळे त्या ठिकाणची झाडे तोडण्यात आली. जागेच्या तटबंदीसाठी ही झाडे तोडण्याची गरज नव्हती. झाडे तशीच ठेवून कंपाउंड बांधता आले असते अशी इतर स्थानिकांची भूमिका
असताना फक्त वैयक्तिक मोठेपणासाठी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याच कॉलनीत अन्यत्र दोन ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून शेड उभारले असताना त्यावर मात्र अळीमिळी गुपचिळी अशी भूमिका झाडे तोडण्याच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकांची आहे असे काही स्थानिकांनी कळविले आहे. या संबंधी वन विभाग आणि हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्याकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.


Recent Comments